अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व अटी शर्थी शिथिल करत मदत करण्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डी येथे माध्यमाशी बोलताना केली. तसेच या नाजूक काळात राजकारण न करता शक्य तितकी मदत करावी असा आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं.