दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार असून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने महानगरपालिके मार्फत वसई विरार परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. वसई विरार परिसरात 105 कृत्रिम तलाव ठिकठिकाणी उभारण्यात आले असून निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.