अकोल्याच्या बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील पैलपाडा येथील महाबीज शेतात जुनं बांधकाम पाडताना एका मजुराच्या अंगावर भिंत पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतक 21 वर्षीय रेहान बेग रमजान बेग काटेपुर्णा येथील रहिवासी होता. रेहान गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम पाडण्याचे काम करत होता. दरम्यान, आज दुपारी तीन वाजता ही घटना घडली, ज्यावेळी घटनास्थळी उपस्थित मजुरांनी त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रेहानच्या दुर्दैवी निधनाने काटेपूर्णा गावासह