शहरातील टिळक चौक वरोरा मार्ग टर्निंगवर उभ्या थार वाहनाची समोरील व दाराची काच एका मनोरुग्ण युवकाने दगड मारून फोडली. यात कार मालकाचा तब्बल 50 हजार रुपयांचा नुकसान झाला. घटनेनंतर टिळक चौकावर बघ्यांची गर्दी झाली. काच फोडणारा मनोरुग्ण युवक पळून जात असताना लोकांनी त्याला पकडन पोलिसांच्या स्वाधीन केले.