तालुक्यातील बामणडोह नाल्याला पूर आल्याने बामन डोह नाला परिसरातील भटाळा, आसाळा, बोरगाव, बांद्रा ,सालोरी, दिंडोळा जामगाव गावातील शेतकऱ्यांच्या शेततील कापूस आणि सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. नाल्या काठावरील शेकडो हेक्टर वरील कापूस आणि सोयाबीन हे पिके भुईसपाट झाले आहे. याआपत्कालीन संकटामुळे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी आज दि 21 आगस्ट 12 वाजता सामाजिक तथा शेतकरी नेते किशोर डुकरे सह शेतकऱ्यांनी केली आहे.