देऊळगाव राजा -दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेत भाजपाची बैठक बालाजी नगर येथील राजेश भुतडा यांच्या निवासस्थानी संपन्न झाली या बैठकीत जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आगामी नगरपरिषद निवडणूक संदर्भात सदर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली या बैठकीत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते