सातपूर गावातील मार्केटमध्ये जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर गावातील मार्केटमध्ये काहीजण स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरीत्यांनी पैसे लावून खेळत असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. अन्वर दिलावर शेख, अमोल भोगाजी दातार, मारुती साबळे व बाळू वामन काळे अशांना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार दीपक खरपडे पुढील तपास करीत आहे.