बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अभयारण्यातील पलढग धरण शंभर टक्के भरला आहे असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे,हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पलढग धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.सांडव्या जवळ कुठलाही जीवघेणा स्टंट करू नये,असे आवाहन वन्यजीव वनविभागाचे खामगाव आरएफओ दिपेश लोखंडे व बुलढाणा आरएफओ प्रकाश सावळे यांनी केले आहे.