डोंगरगाव (ता. हवेली) हद्दीमध्ये वाडेबोल्हाई रोड, वाघमारे वस्ती येथील एकदंत मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी दुकानातील नवीन, जुने मोबाईल तसेच अॅक्सेसरीज असा जवळपास दीड लाखाचा ऐवज चोरून नेला असून याप्रकरणी सौरभ वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.