सटाण्याच्या आराई शिवारातील आरम नदीच्या पात्रात सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटली Anc: दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील आराई शिवारात आरम नदी बंधाऱ्यात सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश ठोके, अजित देवरे, समाधान कदम यांच्या अथक प्रयत्नातुन मृतदेहाची खरी ओळख पटली.