महागाव तालुक्यातील सुधाकर नगर (पेढी) येथे बुधवारी (३ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता धक्कादायक घटना घडली. मनोरुग्ण नातवाने वृद्ध आजीची काठीने मारहाण करून हत्या केली. मृत आजीचे नाव कोंडीबाई वालचंद जाधव (८५) असून आरोपी नातू श्याम उत्तम जाधव (२०) आहे. श्याम हा मानसिक आजाराने त्रस्त असून यापूर्वी त्याने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच एकदा गावातील घराला आग लावल्याची माहिती मिळते.