प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय शाखा,रत्नागिरी यांच्या वतीने दादी प्रकाशमनी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे ब्लड सेंटर येथे करण्यात आले.प्रजपिता ब्रह्मकुमारी रत्नागिरी सेंटरच्या संचालिका राजयोगिनी ब्र कु. शारदा बहेनजी, राजयोगिनी ब्र कु. राजयोगिनी बहेनजी आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे ब्लड सेंटर येथे डॉ.अर्जुन सुतार यांचे प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उदघाट्न सपन्न झाले.कार्यक्रमात रक्तदानाचे महत्त्व, त्याचे वैद्यकीय आणि आध्यात्मिक लाभ यावर प्रकाश टाकण्यात आला. 'रक्तदान म्हणजे जीवनदान' या संकल्पनेला साकार करत उपस्थितांनी एकतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.