अमरावती मध्यवर्ती कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत कैद्याचे नाव कवडू दौलत बोबडे (वय ४८) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कैदी कवडू बोबडे याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता. ६४५७ क्रमांकाचा हा कैदी असून, त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा म