इराई नदी काठावरील शहरातील 29 नागरिकांना मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने महात्मा ज्योतिबा फुले शाळेत हलवून त्यांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था केली आहे, त्याचप्रमाणे ईरई नदीतुन मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत असल्याने जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले असुन पाणीपुरवठा नियमित होतपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपुन वापर करण्याचे आवाहन मनपा तर्फे आज दि 3 सप्टेंबर ला 12 वाजता करण्यात येत आहे.