कन्ट्रक्शन साईडवर काम करत असताना कामगाराला इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मुंबई नाका, वल्लभ नगर येथे घडली असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार श्याम गंगाधर जोगदंड वय 29 राहणार बजरंगवाडी हे मुंबई नाका भागातील वल्लभनगर येथे कंट्रक्शन साईडवर काम करत असताना अचानक केनच्या मोटरचा शॉक लागून जागेवर बेशुद्ध झाले. त्यांचे वडील गंगाधर जोगदंड यांनी औषध उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.