पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पंचायत समितीच्या शेतकरी सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आमदार आवताडे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरत कामकाजाविषयी कठोर शब्दांत जाब विचारला. "तुम्ही काम काय करता?" असा थेट सवाल आमदार आवताडे यांनी काही अधिकाऱ्यांना फोनवरून विचारल्याचे उपस्थितांना पाहायला मिळाले.