औसा :-पैंगरवासी सय्यद युसुफ तानेशा पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त औसा येथे मोफत होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. औसा येथील प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर जिलानी पटेल यांच्या पुढाकाराने हे शिबिर 13 सप्टेंबर रोजीसकाळी 11 ते 5 यादरम्यान मेन रोडवरील लाईफ लाईन होमिओपॅथिक क्लिनिक येथे पार पडले.