ऐन गणेशोत्सवात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. टिटवाळा जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झालं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. टिटवाळा-आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे कल्याणहून टिटवाळ्याकडे जाणारी रेल्वे सेवा अर्धा तास उशिराने धावत आहे. तर टिटवाळ्याहून कल्याणकडे येणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.