: पुण्यातील सर्व गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील तृतीयपंथीय बांधवांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करण्यात आली. तृतीयपंथीयांनी अत्यंत मनोभावे पूजा-अर्चा करत बाप्पाचे चरणी आपली भक्ती अर्पण केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात मंदिर परिसरात भक्तीचा माहोल दाटून आला होता.