भंडारा शहरातील राधाकृष्णन वार्ड येथील अमित जोशी यांना मेंदूचा त्रास असल्याने उपचाराकरिता 15 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांचा मुलगा हिमांशू याने भंडारा शहरातील मनपुरम गोल्ड लोन बँकेत 292 ग्राम सोने गहाण ठेवून गोल्ड लोन घेतलेले होते. त्यात मनपुरम बँकेच्या व्यवस्थापाने त्यांची 17 लाख 76 हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी हिमांशू जोशी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक 19 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.