सोन्या मारुती चौकात घरफोडी करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याचे कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे 18 तोळे 5 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख 29 हजार 500 रुपये अशी एकूण 15 लाख 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.