मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे.मात्रअद्याप पर्यंत काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंदोलन मुंबईकडे येत आहेत. परंतु आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे मुंबईमध्ये आंदोलकांना येऊ न देण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांकडून आंदोलकांना रोखले जात आहे. आनंदनगर टोल नाक्यावर मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलकांना रोखल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांमध्ये वाद झाला.