Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: जिल्ह्यातील ७ ठिकाणचे दारू व जुगार अड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त, धाडसत्रात ४ लाख ७७ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Bhandara, Bhandara | Sep 9, 2025
भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दि. ८ सप्टेंबर रोजी टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे दारू व जुगाराचे ७ अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत. यात १४ आरोपींच्या ताब्यातून ४ लाख ७७ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर आरोपींवर तुमसर भंडारा आंधळगाव व गोबरवाही या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us