शहरातील राजेंद्र वॉर्ड परिसरात राहणाऱ्या वसीम रफिक खान (३५) या ड्रायव्हरने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. वसीम खान हे ड्रायव्हरचे काम करत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांना स्थिर असे काम मिळत नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात होते. याच काळात दारूचे व्यसनही वाढले होते. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक संकटांचा ताण सहन न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.