एकता आणि सौहार्दाचे प्रतीक बनलेल्या भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातून ईद-ए-मिलादुनबीची भव्य रॅली काढण्यात आली. सदर दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता दरम्यान रॅली भंडारा शहरात भ्रमण करण्यात आली. या कार्यक्रमात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे, भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सचिव मोहम्मद आबिद सिद्दिकी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रुबी चढ्ढा व अन्य हजर होते