आज ६ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी ४ वाजता मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी सुपर हायवे एक्सप्रेसमध्ये एक लहान मुलगी आढळली आहे जी तिचे नाव आणि पत्ता सांगू शकत नाही. मंगरूळ चव्हाळा प्रभारी पोलीस निरीक्षक राजीव हाके यांनी या संदर्भात आवाहन केले आहे आणि जर कोणाला अल्पवयीन मुलीबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.