ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत १० जणांना रंगेहात पकडले. डाबकी रोडवरील रमेश नगर भागात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या तीनपत्ती जुगारावर ही कारवाई करण्यात आली. या वेळी तब्बल ६४,६५० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अनिल चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरी