उदगीर शहरातील समता नगर भागात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली,याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, उदगीर शहरातील समता नगर भागात फिर्यादीचा भाऊ पिंटू कोंडीबा गायकवाड यांचा अनैतिक संबंधातून आरोपीने संगनमत करून ५ सप्टेंबर रोजी रात्री त्याचा खून केला,व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नेत्रगावं रोडवर नेऊन टाकून दिला हणमंत कोंडीबा गायकवाड यांच्या फिर्यादी वरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय