भंडारा जिल्ह्यातील बोरी येथील गौतम अशोक कांबळे वय 27 वर्षे हे दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान आपल्या घरी हजर असताना आरोपी नितीन बागडे रा. बामणी याने त्यांच्या घराबाहेर येऊन जुन्या वादातून गौतम याला घराबाहेर बोलवून आरोपी अमोल शहरे रा. बोरी याच्यासह अंगावर धावून गौतम याला लाठ्या काठ्याने मारण्यास सुरुवात केली. या भांडणामध्ये गौतम यांची आई, वडील, मोठा भाऊ व त्यांचे कुटुंबीय वाचविण्याकरिता आले असता त्यांना सुद्धा 7 ते 8 आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून जखमी केले.