उन्हाळी सुट्टीत किंवा शाळेच्या सुट्टी दिवशी गल्ली-बोळात, चौकात, लहान मुलांचा होणारा गोंगाट सध्या कधी कानावर पडतच नाही. कारण ही लहान मुले आणि तरुण सोशल मिडीयामुळे मोबाईलमध्ये हरवून गेली आहेत. जुन्या अनेक खेळांची काहींना माहितीच नाही. तर काहींच्यात असे खेळ विस्मरणात गेले आहेत. या सर्वांना या खेळांची पुन्हा आठवण करुन त्याकडे ओढा निर्माण करण्यासाठी शहरातील ब्राम्हणपूरीत राहणाऱया सुदन जाधव या इंजिनियरने आपल्या घरगुती गणेशोत्सवासमोर अशा जुन्या पारंपारीक खेळांना प्राधान्य देणारा देखावा सादर क