मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज रंगे पाटील आजपासून आझाद मैदानावर अमरण उपोषणाला बसले आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारले असता,' मी मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण दिले असून त्याचा लाभ मराठा समाज घेत आहे, परंतु ओबीसी समाजाचे आरक्षण काढून ते मराठा समाजाला देऊन त्यांच्यावर अन्याय करता येणार नाही 'असे मोठे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कायद्याच्या चौकटीत बसेल ते सर्व काही आम्ही करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.