अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका इसमास शहर पोलिसांनी तिनपुतळे परिसर येथे १ जुलै रोजी दुपारी ३ .३० वाजेदरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ७७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ संतोष शंकर गवई यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तिनपुतळे परिसर येथे छापा टाकून वसंता बंडू शेगोकार वयं 61 वर्ष रा. तिनपुतळे परिसर, शेगाव यास पकडले.पोलिसांनी त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या २२ नग शिष्या व थैली जप्त.