Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Oct 7, 2025
फुलंब्री शहरांमध्ये महात्मा फुले चौकामध्ये जळगाव महामार्गावर संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावे, गोठ्याच्या अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी सदरील रास्ता रोको करण्यात आला.