गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात पोलीस दलाच्या वतीने मॉकड्रिल प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.आज शनिवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शिवतीर्थ येथे या मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.या प्रात्यक्षिकामध्ये नागरिकांना अचानक घडणाऱ्या घटनांसाठी कसे सज्ज राहावे,अश्रूधुराच्या नळकांड्यांपासून कसे बचाव करायचे आणि एखादा बॉम्ब सदृश्य वस्तू असल्यास त्यापासून कसा बचाव करायचा याची माहिती दिली गेली.