देशातील शेतकरी जाती-धर्मात, प्रांतात विभागलेला असताना त्यांच्या प्रश्नांची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.कृषीप्रधान असलेल्या भारताची कृषी क्षेत्रात अधोगती होत असूनही संसद आणि विधानसभांमध्ये कोणीच या विषयावर ठामपणे बोलायला तयार नाही, अशी तीव्र टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्या वतीने गजरौला येथे आयोजित किसान-मजदूर स्वाभिमान महापंचायतीत केली आहे.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरदार व्ही.एम. सिंग होते.