दिंडोरी तालुक्यातील कांदा मार्केट जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामुळे घडलेल्या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यापेक्षाही मोठा खड्डा वाघाड उमराळे रस्त्यावर खोदलेला असून या खड्ड्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष नामदेव गावित यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. व संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.