वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी ठाणे शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. ठाणे शहरांमध्ये तब्बल साडेसहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यातील साडेतीनशे कॅमेरे हे वाहतूक विभागासाठी देण्यात आले आहेत. त्यातील तब्बल 12 कॅमेरे कॅडबरी सिग्नल येथे आज बसवण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे जर वाहतुकीचे नियम मोडले तर कारवाई होणार अशी प्रतिक्रिया उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली