मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले असल्यामुळे महाराष्ट्रभरातून मराठा आंदोलन मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता,' मागच्या वेळी नवी मुंबईला जरांगे यांना भेटले होते,मग आता हे आंदोलन का सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला आणि एकनाथ शिंदेच यावर उत्तर देऊ शकतील असे राज ठाकरे ठाण्यातील मनसेच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.