वानवडीतील राज्य राखीव पोलीस दल गट क्रं. १ येथे नवप्रविष्ट पोलीस शिपाई दिक्षांत संचलन समारंभ पार पडला. या समारंभात भा.पो.से महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल चे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर, भा.पो.से राज्य राखीव पोलीस बल पुणे परिक्षेत्राचे विजय कुमार मगर व गट क्रं १ च्या समादेशक तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थी सत्र क्र. ६८ ब च्या ३३५ नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांनी शपथ ग्रहण केली.