माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीवर आधारित जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम बीबी गावात आज दि 23 आगस्ट 5 वाजता तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध देखाव्यांनी नागरिकांची मने बालगोपालांनी जिंकली .या स्पर्धेत.प्रथम पारितोषिक कृतिका बोबडे द्वितीय पारितोषिक भाविक थेरे तृतीय पारितोषिक साई टोंगे चतुर्थ पारितोषिक हर्षिता घुगुल यांनी पटकाविला. एकूण 56 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.