सहकार शिरोमणी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची बिले द्यावीत अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर आरसीसी कारवाई करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले असून शेतकऱ्यांची बीले दिले नाहीत. तर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.