विष्णूंनी पृथ्वीला समुद्रात नेणाऱ्या हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी डुक्कर (वराह) रूप धारण केले.हा अवतार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो,ज्याला 'वराह जयंती' म्हणतात.या अवतारात विष्णूंनी एक हजार वर्षांच्या युद्धात हिरण्याक्षाचा पराभव केला होता.तसेच पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढून पुन्हा स्थापित केले.याच पार्श्वभूमीवर नाशिकरोड सकल हिंदू समाजाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली.