तुमसर तालुक्यातील आष्टी येथे गोबरवाही पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. २६ ऑगस्ट रोजी मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी संदीप मेश्राम वय ३५ वर्षे रा. आष्टी या मटका बहाद्दराच्या ताब्यातून आकडे लिहिलेली सट्टापट्टी, डॉट पेन व सट्टा जुगार खेळण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत ८३३ रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा गोबरवाही पोलिसांनी तपासात घेतला आहे.