सेनगांव तालुक्यातील तळणी या ठिकाणी आज विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साह संपन्न झाला असून यावेळी जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळणी येथील फाटा परिसरामध्ये लोक वर्गणी मधून भव्य अशी कमान उभारण्यात येणार असून या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाला आहे.