शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरती शहर पोलिसांन द्वारा रविवारी दुपारी पथसंचलन पार पडले हे पथसंचलन शहर पोलीस स्टेशन येथुन प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोनू चौक, जयस्तंभ चौक, बडा अलावा, यात्रा चौक,नरसिंग रोड या मार्गाने जाऊन शहर पोलीस स्टेशन येथे रूट मार्च सांगता करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यासह शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी या रूटमार्च मध्ये सहभाग घेतला होता.