अंबाजोगाई शहराजवळील वरद पार्क परिसरात गेल्या काही तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले असून, पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पार्क परिसरात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळावे, अशी सूचना स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी केली आहे.