पुण्यातील राजाराम पूल येथे एका तरुणाने पाण्यात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी संबंधित तरुणाचे प्राण वाचवले आहेत. पार्थ लोहिया असे या तरुणाचे चे नाव असून तो इंजिनिअरिंगला 3 वेळा नापास झाल्यामुळे त्याने हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरु आहे.