डोक्यावर शेतीवरील थकीत पिक कर्ज असल्याच्या विवंचनेत एका वृध्द शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शेगाव खुर्द येथे दिनांक ३० रोज शनिवारला सकाळी ९ वाजता उघडकीस आली. नामदेव कवडू गायकवाड वय६२ वर्ष राहणार शेगाव खुर्द असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.