रुपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयी सुविधा,सुरक्षीततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन,रुपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी यांची संयुक्त बैठक रुपाभवानी मंदिरात आज सायं घेण्यात आली.या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयी सुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सुचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केले यावर परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी पोलिस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही अस सांगितले