पोलीस ठाणे सीताबर्डी अंतर्गत येणाऱ्या संविधान चौक येथे भीषण अपघात झाला ज्यामध्ये ट्रकचा चाक अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालक पती किरकोळ जखमी झाला आहे. मृतक महिलेचे नाव वनिता भुते सांगण्यात आले आहे. वनिता या त्यांचे पती भोजराज भुते यांच्यासोबत दुचाकीने सदर येथे चिकटसाठी आल्या होत्या. दरम्यान त्या पाटणसावंगी येथे गावी जात असताना संविधान चौकाच्या मधोमध त्यांच्या दुचाकीला मागून ट्रकने धडक दिली.